जेष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन !

Foto

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने जेष्ठ सिनेअभिनेते कादर खान हे रुग्णालयात होते. जिंदगी इम्तिहान लेती है और जो आदमी उस इम्तिहान में फर्स्ट आता है, वो असली हिरो कहलाता है.'' असे एकापेक्षा एक संवाद लिहून अनेक हिंदी चित्रपटांना यशाचा मार्ग दाखवणारे बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेते, पटकथा व संवादलेखक कादर खान याचं आज निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. कॅनडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एक सच्चा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

कुटुंबीयांसोबत कॅनडाला वास्तव्यास असलेले कादर खान हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी या व्याधीने ग्रस्त होते. या आजारामुळं त्यांना चालायला त्रास होत होता. त्यांना विस्मृतीचाही आजार जडला होता. श्वसनाचा त्रास वाढल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

 

कादरखान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. १९७३ मध्ये 'दाग' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. चार दशकांमध्ये ३००हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. त्यामुळं सुरुवातीच्या काळात खलनायक म्हणून पडद्यावर अवतरलेले कादर खान नंतर लोकांना पोटभर हसवत राहिले. कादर खान-अमिताभ, कादर खान-गोविंदा यांच्यासोबत त्यांनी केलेले चित्रपट सुपरहिट ठरले.

 

पटकथाकार

 

अभिनयासोबतच कादर खान यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मनमोहन देसाई-कादरखान या जोडीने लिहिलेले अमर अकबर अॅंथनी, कुली, ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट प्रचंड गाजले. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर २०१३मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

 

पुरस्कार

 

आपली कला आणि आवाजाने  प्रभावित करणाऱ्या कादर खान यांना काही पुरस्कार मिळाले आहेत.

 

2013 - साहित्य शिरोमणि पुरस्कार (हिन्दी चित्रपटात  दिलेले  योगदान )

1982 - फ़िल्म फ़ेयर अवार्ड (बेस्ट डाइलोग "मेरी आवाज सुनो")

1981 - फ़िल्म फ़ेयर बेस्ट कॉमेडियन (बाप नम्बरी बेटा दस न